Ad will apear here
Next
डॉ. राजाभाऊ, रेणू दांडेकरांचा सन्मान
पुणे : आंतरराष्ट्रीय पालक दिनाचे औचित्य साधून ‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या वर्धापदिनानिमित्त डीपर व सर फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘महापालक सन्मान २०१७’ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजाभाऊ व रेणू दांडेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर उपस्थित राहणार असल्याची माहिती सर फाउंडेशनचे संस्थापक हरीश बुटले यांनी दिली.

त्याचप्रमाणे डीपर व सर फाउंडेशनतर्फे परिसंवादही घेण्यात येणार आहे. याचा विषय ‘लोकसहभागातून ग्रामीण भागातील शाळांसाठी सुविधा उभारणे काळाची गरज आहे का?’ असा असून, पोपटराव पवार, डॉ. रवींद्र कोल्हे, इंद्रजित देशमुख, प्रदीप लोखंडे, अॅड. उदय वारुंजीकर, यजुवेंद्र महाजन, ईश्वरलाल परमार हे वक्ते असणार आहेत. परिसंवाद कोथरूडच्या जे. पी. नाईक प्रशिक्षण केंद्रात सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.

सन्मान सोहळा
दिवस : रविवार, २३ जुलै २०१७
वेळ : सायंकाळी साडेचार वाजता
स्थळ : लोकमान्य सभागृह, केसरीवाडा, नारायण पेठ, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZDXBE
Similar Posts
‘संस्कारक्षम शिक्षणाच्या अभावाने समाजात असंवेदनशीलता’ पुणे : ‘मन आणि बुद्धी यांची फारकत झाली, तर माणूस घडत नाही. सद्यस्थितीत शिक्षण क्षेत्रात अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेत संस्कार आणि मूल्यांचा अभाव आहे. परिणामी समाजात असंवेदनशीलता फोफावत आहे. माणसातील आपुलकी लोप पावते आहे. त्यामुळे संस्कारक्षम शिक्षण आणि राज्यघनेतील मूल्ये मुलांमध्ये
‘टिळकांचे विचार दांडेकर दाम्पत्याने कृतीत उतरवले’ पुणे : ‘डॉ. राजाभाऊ आणि रेणू दांडेकर यांनी कौशल्यपूर्ण, प्रकल्पाधारित शिक्षणातून चिखलगावमध्ये विद्यार्थी घडविले आहेत. कठीण प्रसंगालाही सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्याचे काम हे दाम्पत्य करीत आहे. शिक्षणासंबंधी लोकमान्य टिळकांनी मांडलेले विचार आचरणात आणून ते कृतीत उतरविण्याचे कार्य दांडेकर दाम्पत्याने केले आहे
डॉ. राजेंद्रसिंह यांना ‘महापालक राष्ट्रीय सन्मान’ जाहीर पुणे : डीपर, सर फाउंडेशन व ‘तुम्ही-आम्ही पालक’ यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय पालकदिनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘महापालक राष्ट्रीय सन्मान’ पुरस्कार यंदा जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा आणि मीनासिंहजी यांना, तर ‘संस्थापालक सन्मान’ पुरस्कार वरोरा येथील ज्ञानदा जीवन विकास केंद्राचे संस्थापक प्रा. मधुकर उपलेंचवार यांना जाहीर झाला आहे
‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी असावा’ पुणे : ‘केवळ गुणांवर आधारित आणि पुस्तकी शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी मोजली जात आहे. गुणांच्या फुगवट्याने विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन होत नाही. त्यामुळे दहावीत शंभर टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यालाही महाविद्यालयीन स्तरावर नापास होण्याची वेळ येते. शिवाय, नोकरीच्या ठिकाणी त्याला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language